भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३२२ :
प्रतिफलाबाबतचे खोटे कथन अंतर्भूत असणारे हस्तांतरणपत्र अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने निष्पादित करणे:
कलम : ३२२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : प्रतिफलाबाबतचे खोटे कथन अंतर्भूत असणारे हस्तांतरणपत्र कपटीपणाने निष्पादित करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : त्यामुळे बाधित झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
ज्याद्वारे कोणतीही मालमत्ता किंवा तिच्यातील कोणताही हितसंबंध हस्तांतरित झाल्याचे किंवा ते एखाद्या प्रभारास अधीन झाल्याचे दिसते आणि ज्यामध्ये असे हस्तांतरण किंवा प्रभार याच्या प्रतिफलासंबंधी, किंवा ज्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या उपयोगासाठी किंवा फायद्यासाठी त्याचे प्रवर्तन होणे वस्तुत: उद्देशित आहे त्यांच्यासंबंधी ज्यामध्ये कोणतेही खोटे कथन अंतर्भूत आहे असा कोणताही विलेख किंवा संलेख जो कोणी अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने स्वाक्षरित करील, निष्पादित करील, किंवा त्यास पक्ष होईल त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावसाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.