भारतीय न्याय संहिता २०२३
मालमत्तेचे कपटपूर्ण विलेख आणि विल्हेवाटी यांविषयी :
कलम ३२० :
मालमत्तेची धनकोंमध्ये विभागणी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ती अप्रामणिकपणाने हलविणे किंवा लपविणे :
कलम : ३२०
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मालमत्ता इत्यादींची धनकोंमध्ये विगागणी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ती कपटीपणाने हलवणे किंवा लपवणे.
शिक्षा : सहा महिन्यापेक्षा कमी नाही परंतु २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : त्यामुळे बाधित झालेले धनको.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जर कोणी एखादी मालमत्ता अप्रामणिकपणाने किंवा कपटीपणाने हलविली, लपवून ठेवली किंवा एखाद्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली, किंवा हस्तांतरित करविली आणि त्यायोगे आपल्या धनकोंमध्ये किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींच्या धनकोंमध्ये कायद्यानुसार त्या मालमत्तेची विभागणी होण्यास प्रतिबंध करण्याचा त्याचा उद्देश असेल, किंवा त्यामुळे तसा प्रतिबंध होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, त्याला सहा महिन्यांपेक्षा कमी नसेल परंतु दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.