Bns 2023 कलम ३१२ : प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा, किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३१२ :
प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा, किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे :
कलम : ३१२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा किंवा दरवडा घालण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा : किमान ७ वर्षांचा सश्रम कारावास .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जबरी चोरी करण्याचा, किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्याच्या वेळी अपराधी कोणत्याही प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असेल तर, अशा अपराध्याला ज्या कारावासाची शिक्षा होईल तो सात वर्षांपेक्षा कमी असणार नाही.

Leave a Reply