Bns 2023 कलम ३११ : मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३११ :
मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा :
कलम : ३११
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मृत्यु किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरवडा.
शिक्षा : किमान ७ वर्षांचा सश्रम कारावास .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जबरी चोरी करण्याच्या किंवा दरोडा घालण्याच्या वेळी जर अपराध्याने कोणत्याही प्राणघातक हत्याराचा उपयोग केला अथवा कोणत्याही व्यक्तीस जबर दुखापत केली, अथवा कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याचा किंवा तिला जबर दुखापत करण्याचा प्रयत्न केला, तर अशा अपराध्याला ज्या कारावासाची शिक्षा होईल, त्याची मुदत सात वर्षांपेक्षा कमी असणार नाही.

Leave a Reply