Bns 2023 कलम ३०५ : राहते घर, वाहतुकीची साधने किंवा प्रार्थनास्थळ इत्यादीमध्ये चोरी :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३०५ :
राहते घर, वाहतुकीची साधने किंवा प्रार्थनास्थळ इत्यादीमध्ये चोरी :
कलम : ३०५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : राहते घर, वाहतुकीची साधने किंवा प्रार्थनास्थळ इत्यादीमध्ये चोरी.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी, –
(a) क)(अ) जी कोणतीही इमारत, तंबू किंवा जलयान मानवी वसतिस्थान म्हणून वापरण्यात येत असेल, किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेसाठी वापरण्यात येत असेल त्या इमारतीमध्ये, तंबूमध्ये किंवा जलयानामध्ये जो कोणी चोरी करील; किंवा
(b) ख) (ब) माल किंवा प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही वाहतुकीच्या साधनांमध्ये चोरी करील; किंवा
(c) ग) (क) माल किंवा प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही वाहतुकीच्या साधनांमध्ये कोणत्याही वस्तु किंवा मालाची चोरी करील; किंवा
(d) घ) (ड) कोणत्याही पूजेच्या ठिकाणाची मूर्ती किंवा चिन्हाची (प्रतिक) यांची चोरी करील; किंवा
(e) ङ) (इ) शासन किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही मालमत्तेची चोरी करील,
त्याला सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र असेल.

Leave a Reply