Bns 2023 कलम ३०४ : झपटमारी (हिसकावून घेणे / स्नॅचिंग) :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३०४ :
झपटमारी (हिसकावून घेणे / स्नॅचिंग) :
कलम : ३०४ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : झपटमारी (हिसकावून घेणे / स्नॅचिंग).
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जर चोरी करण्यासाठी अपराध्याने अचानक किंवा वेगाने किंवा बळजबरीने कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याच्या ताब्यातून कोणतीही जंगम मालमत्ता जप्त केली किंवा सुरक्षित केली किंवा हिसकावून घेतली तर चोरी झपटमारी या सदरात मोडते.
२) जो कोणी झपटमारी करेल, त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र असेल.

Leave a Reply