भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३०२ :
धार्मिक भावना दुखवण्याच्या बुध्दिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे इत्यादी :
कलम : ३०२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : धार्मिक भावना दुखवण्याच्या बुध्दिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे इत्यादी.
शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिच्या धार्मिक भावना दुखावणे अभिप्रेत असेल ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी, कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने त्या व्यक्तीच्या कानावर पडेल अशा तऱ्हेने कोणताही शब्द उच्चारील, किंवा कोणताही आवाज काढील, अथवा त्या व्यक्तीच्या नजरेस पडेल असा कोणत्याही हावभाव करील, किंवा त्या व्यक्तीच्या नजरेस पडेल अशा तऱ्हेने कोणतीही वस्तू ठेवील त्याला, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.