भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३०१ :
पुरण्याच्या जागी इत्यादी ठिकाणी अतिक्रमण :
कलम : ३०१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पुरण्याच्या जागी इत्यादी ठिकाणी अतिक्रमण.
शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखवण्याच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या धर्मांचा अपमान करण्याच्या उद्देशाने अथवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाण्याचा संभव आहे, किंवा कोणत्याही व्यक्तीच्या धर्माचा अपमान होण्याचा संभव आहे या जाणिवेने, कोणत्याही उपासनास्थानी किंवा कोणत्याही दफनाच्या जागी, किंवा अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी अगर मृतांच्या अवशेषांचे निक्षेपस्थान (जतन करणारे स्थान) म्हणून अलग राखलेल्या कोणत्याही जागी कोणत्याही प्रकारे अतिक्रमण करील, किंवा कोणत्याही मानवी शवाची कशाही प्रकारे अप्रतिष्ठा करील अगर अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी जमलेल्या कोणत्याही व्यक्तींना व्यत्यय आणील, त्याला एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.