Bns 2023 कलम २९८ : कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासनास्थानाचे नुकसान करणे किंवा ते अपवित्र करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण १६ :
धर्मासंबंधीच्या अपराधांविषयी :
कलम २९८ :
कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासनास्थानाचे नुकसान करणे किंवा ते अपवित्र करणे :
कलम : २९८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तिवर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासनास्थान किंवा पवित्र वस्तू नष्ट करणे, तिचे नुकसान करणे किंवा ती अपवित्र करणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जर कोणी इसमाने कोणतेही उपासनास्थान किंवा कोणत्याही व्यक्ती वर्गांने पवित्र मानलेली कोणतीही वस्तू नष्ट केली, त्यांचे नुकसान केले किंवा ती अपवित्र केली त्यायोगे कोणत्याही व्यक्ती वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याचा त्याचा उद्देश असेल अथवा त्याप्रमाणे नाश करणे, नुकसान करणे किंवा अपवित्र करणे हा आपल्या धर्माचा अपमान आहे असे एखाद्या व्यक्तिवर्गाला वाटणे संभवनीय असल्याची त्या इसमाला (व्यक्तीला) जाणीव असेल तर, त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply