भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २९६ :
अश्लील कृती आणि गाणी :
कलम : २९६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अश्लील गाणी.
शिक्षा : ३ महिन्यांचा कारावास, किंवा १००० रुपयांपर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी, इतरांना त्रास होईल अशा प्रकारे –
(a) क) कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणतीही अश्लील कृती करील, किंवा
(b) ख) कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा जवळपास कोणतेही अश्लील गाणे, लावणी पोवाडा किंवा शब्द गाईल, पाठ म्हणेल, अगर उच्चारील,
त्याला तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा एक हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.