भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २९१ :
प्राण्याबाबत हयगयीचे वर्तन :
कलम : २९१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीने आपल्या कब्जातील कोणत्याही प्राण्यापासून मानववी जीविताला पोचणाऱ्या धोक्याच्या किंवा जबर दुखापत होण्याच्या संबंधात खबरदारी म्हणून अशा प्राण्याचा बंदोबस्त करण्याचे टाळणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी आपल्या कब्जातील कोणत्याही प्राण्यामुळे मानवी जीवितास पोचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून किंवा जबर दुखापतीच्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त अशा प्राण्याबाबत करण्याचे जाणीवपूर्वक किंवा हयगयीने टाळील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.