Bns 2023 कलम २८६ : विषारी पदार्थाबाबत हयगयीचे वर्तन :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८६ :
विषारी पदार्थाबाबत हयगयीचे वर्तन :
कलम : २८६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येणे इत्यादी गोष्टी होतील अशा प्रकारे कोणत्याही विषारी पदार्थाबाबत हयगयीचे वर्तन करणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येईल अथवा कोणत्याही व्यक्तीला दुखापत किंवा क्षती (नुकसान) पोचण्याचा संभव असेल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने जो कोणी विषारी पदार्थाबाबत कोणतीही कृती करील, अथवा आपल्या कब्जामधील कोणत्याही विषारी पादार्थामुळे मानवी जीवितास पोचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त अशा विषारी पदार्थाबाबत करण्याचे जाणीवपूर्वक अगर हयगयीने टाळेल, त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply