Bns 2023 कलम २८२ : जलयान बेदरकारपणे (उतावळेपणाने किंवा हयगयीने) चालविणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८२ :
जलयान बेदरकारपणे (उतावळेपणाने किंवा हयगयीने) चालविणे :
कलम : २८२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येणे, इत्यादी गोष्टी होतील इतक्या बेफामपणे किंवा हयगयीने एखादे जलयान चालवणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा १०००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जेणेकरून मानवी जीवित धोक्यात येईल अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत किंवा क्षती (नुकसान) पोचण्याचा संभव असेल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने जो कोणी एखादे जलयान चालवील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा दहा हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply