Bns 2023 कलम २७ : बालकाच्या किंवा विकल मनाच्या व्यक्तीच्या हितासाठी पालकाने किंवा पालकाच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २७ :
बालकाच्या किंवा विकल मनाच्या व्यक्तीच्या हितासाठी पालकाने किंवा पालकाच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती :
बारा वर्षांखालील वयाच्या किंवा विकल मनाच्या एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी त्याचे पालकाने किंवा ज्याच्याकडे त्या व्यक्तीचा कायदेशीर रक्षणभार (ताबा) आहे अशा अन्य व्यक्तीने किंवा त्याच्या किंवा तिच्या स्पष्ट किंवा गर्भित संमतीने सद्भावपूर्वक केलेली कोणतीही गोष्ट (कृती), तिच्यामुळे त्या व्यक्तीला जो कोणताही अपाय घडेल, किंवा घडावा असे कत्र्याला उद्देशित असेल, किंवा घडण्याचा संभव असल्याची कत्र्याला जाणीव असेल तर घडलेला अपाय अपराध होत नाही :
परंतु हा अपवाद –
(a) क) (अ) उद्देशपूर्वक मृत्यू घडवून आणण्याच्या, किंवा मृत्यु घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या बाबतीत,
(b) ख) (ब) कोणतीही गोष्ट करणाऱ्या व्यक्तीला त्या गोष्टीमुळे मृत्यु घडून येणे संभवनीय आहे अशी जाणीव असेल तर, ती गोष्ट मृत्यू किंवा जबर दुखापत टाळणे याहून अथवा कोणताही भीषण रोग किंवा विकलता बरी करणे याहून अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी करण्याच्या बाबतीत,
(c) ग) (क) इच्छापूर्वक जबर दुखापत करण्याच्या, किंवा जबर दुखापत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या बाबतीत हा अपवाद, मात्र मृत्यु किंवा जबर दुखापत टाळण्यासाठी अथवा कोणताही भीषण रोग किंवा विकलता बरी करण्यासाठी ते केले असेल तर गोष्ट वेगळी;
(d) घ) (ड) जो कोणताही अपराध करण्याच्या बाबतीत हा अपवाद लागू होण्यासारखा नाही त्याच्या अपप्रेरणाच्या बाबतीत,
लागू नाही.
उदाहरण :
मुतखडा काढून टाकण्यासाठी आपल्या अपत्यावर शस्त्रक्रिया केल्यास त्यामुळे त्याचा मृत्यू घडून येण्याचा संभव असल्याची जाणीव असताना, पण त्या अपत्याचा मृत्यु घडून यावा असा उद्देश नसताना (क) आपल्या अपत्याच्या हितासाठी त्याच्या संमतीशिवाय याच्यावर शल्यचिकित्सका मार्फत शस्त्रक्रिया करवतो. अपत्याला बरे करणे हे (क) चे उद्दिष्ट होते, असे असल्यामुळे तो अपवादाच्या कक्षेत येतो.

Leave a Reply