Bns 2023 कलम २५७ : न्यायिक कार्यवाहीत लोकसेवकाने भ्रष्टतापूर्वक बेकायदा अहवाल देणे इत्यादी:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २५७ :
न्यायिक कार्यवाहीत लोकसेवकाने भ्रष्टतापूर्वक बेकायदा अहवाल देणे इत्यादी:
कलम : २५७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने न्यायिक कार्यवाहीत बेकायदा असल्याचे आपणास माहीत असेल तो आदेश, अहवाल, अधिनिर्णय किंवा निर्णय भ्रष्टतापूर्वक देणे व अधिघोषित करणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
लोकसेवक असून जो कोणी न्यायिक कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यात बेकायदेशीर असल्याचे स्वत:ला माहीत आहे असा कोणताही अहवाल, आदेश, अधिनिर्णय किंवा निर्णय भ्रष्टतापूर्वक अगर दुर्भावपूर्वक करील किंवा अधिघोषित करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply