Bns 2023 कलम २४ : ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २४ :
ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास :
जेव्हा केलेली कृती ही विशिष्ट जाणिवेने किंवा उद्देशाने केलेली असल्याशिवाय अपराध होत नाही अशा प्रकरणांमध्ये, जी व्यक्ती नशेच्या अवस्थेत ती कृती करते त्या व्यक्तीला नशा चढली नसती तर जी जाणीव तिला झाली असती ती जणू काही त्या व्यक्तीला होती असे समजून तिच्या विरुद्ध कार्यवाही केली जाण्यास पात्र असेल, मात्र ज्यामुळे नशा चढली ते द्रव्य तिच्या नकळत किंवा तिच्या इच्छेविरुद्ध तिला पाजण्यात आलेले नसावे.

Leave a Reply