भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २३२ :
एखाद्या व्यक्तीला खोटा पुरावा देण्यासाठी धमकी देणे किंवा प्रवृत्त करणे :
कलम : २३२ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीला खोटी साक्ष देण्यासाठी धमकावणे.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : खोटी साक्ष देण्याबाबतच्या अपराधाची ज्या न्यायालयात विचारणीय होते तेथे.
———
कलम : २३२ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खोट्या साक्षीच्या परिणामी जर निरपराध व्यक्तीला दोषी ठरवले आणि मृत्यूची शिक्षा किंवा सात वर्षापेक्षा अधिक काळाचाी कारावासाची शिक्षा झाली असेल तर.
शिक्षा : अपराधाकरिता असेल तीच
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : खोटी साक्ष देण्याबाबतच्या अपराधाची ज्या न्यायालयात विचारणीय होते तेथे.
———
१) जो कोणी, एखाद्या व्यक्तीला खोटा पुरावा देण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने त्या व्यक्तीच्या शरीरास किंवा लौकिकास किंवा मालमत्तेस हानी पोहोचण्याची किंवा त्या व्यक्तीचे जिच्यामध्ये हितसंबंध आहेत. अशा व्यक्तीच्या शरीरास किंवा लौकिकास हानी पोहोचण्याची धमकी देईल त्याला कोणत्यातरी एका वर्णनाची सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्हीही शिक्षा होतील.
२) जर, अशा खोट्या पुराव्याच्या परिणामी निरपराध व्यक्तीला दोषीसिद्ध ठरविण्यात आले आणि तिला मृत्यूची किंवा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारावासाची शिक्षा झाली तर, ज्या व्यक्तीने धमकी दिली असेल तिला अशा निरपराध व्यक्तीला झाली असेल तीच शिक्षा त्याच रीतीने आणि त्याच व्याप्तीने देण्यात येईल.