Bns 2023 कलम २३० : देहांतदंड्य (फाशी) अपराधाबद्दल दोषसिद्धी घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे किंवा रचणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २३० :
देहांतदंड्य (फाशी) अपराधाबद्दल दोषसिद्धी घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे किंवा रचणे:
कलम : २३० (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : देहान्तदंड अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीची दोषसिद्धी घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे किंवा रचणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षे सश्रम कारावास व ५०००० रुपए द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : २३० (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जर त्यायोगे निरपराध व्यक्ती सिद्धदोष ठरली आणि फाशी गेली तर.
शिक्षा : मृत्यू दंड किंवा वरिलप्रमाणे.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जर कोणी खोटा पुरावा दिला किंवा रचला आणि त्यामुळे भारतात त्या त्या काळी अमलात असलेल्या कायद्यानुसार जो अपराध देहांतदंड्य (फाशी) शिक्षेचा आहे त्या अपराधाबद्दल कोणत्याही व्यक्तीला सिद्धदोष (शिक्षा व्हावी) ठरविण्यात यावे असा त्याचा उद्देश असेल, अगर त्यायोगे तशी दोषसिद्धी (शिक्षा व्हावी) होण्यास आपण कारण होणे संभवनीय आहे अशी जाणीव असेल, तर त्याला आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल, आणि तो पन्नास हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) जर अशा खोटया पुराव्यामुळे एखाद्या निरपराध व्यक्ती पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे सिद्धदोष (शिक्षा झाली) ठरली आणि तशी शिक्षा दिली गेली तर, ज्या व्यक्तीने खोटा पुरावा दिला तिला मृत्यूची किंवा पोटकलम (१) मध्ये वर्णन केलेली शिक्षा होईल.

Leave a Reply