भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २२६ :
कायदेशीर शक्ती (अधिकार) वापरण्यास किंवा वापरण्यापासून निरुद्ध (रोखणे) करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे :
कलम : २२६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कायदेशीर शक्ती (अधिकार) वापरण्यास किंवा वापरण्यापासून निरुद्ध (रोखणे) करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही किंवा सामुदायिक सेवा.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी कोणत्याही लोक सेवकाला आपली शासकीय कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा टाळण्यास त्याला प्रवृत्त करण्याच्या किंवा भाग पाडण्याच्या उद्देशाने आत्महत्येचा प्रयत्न करील त्याला, एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील किंवा सामुदायिक सेवेची शिक्षा होईल.