भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २२० :
लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) मालमत्ता विक्रीस काढली असता ती अवैधपणे (बेकायदेशीरपणे) खरेदी करणे किंवा बोली बोलणे :
कलम : २२०
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मालमत्तेच्या कायदेशीरपणे प्राधिकृत झालेल्या विक्रीत, ती खरेदी करण्यास विधित: अक्षम असलेल्या व्यक्तीने बोली बोलणे, किंवा बोली बोलण्याने येणारी आबंधणे पाळण्याचा उद्देश नसताना बोली बोलणे.
शिक्षा : १ महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
लोकसेवक म्हणून एखाद्याला असलेल्या कायदेशीर प्राधिकारान्वये मालमत्तेचा कोणताही विक्रीचा व्यवहार होत असताना जर कोणी, त्या विक्रीच्या वेळी ती मालमत्ता विकत घेण्यास जी विधित: (कायद्याने) अक्षम (लायक नाही) असल्याचे हे त्याला माहीत आहे, मग ती व्यक्ती म्हणजे तो स्वत:च असो वा अन्य कोणी असो, अशा कोणत्याही व्यक्तीकरता ती खरेदी केली अथवा अशा मालमत्तेकरता बोली बोलला व अशी बोली बोलल्यामुळे तो स्वत:वर जी आबंधने (बंधने) लादून घेतो ती पाळण्याचा त्याचा उद्देश नसेल, तर त्याला एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणतात्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा दोनशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.