भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण ९ :
निवडणुकीसंबंधीच्या अपराधांविषयी :
कलम १६९ :
उमेदवार, निवडणूकविषयक हक्क यांच्या व्याख्या :
या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी –
(a) क) उमेदवार याचा अर्थ ज्या व्यक्तीस कोणत्याही निवडणुकीतील उमेदवार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहे ती व्यक्ती असा आहे.
(b) ख) निवडणूकविषयक हक्क याचा अर्थ, निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याचा किंवा उभे न राहण्याचा अथवा आपली उमेदवारी मागे घेण्याचा अथवा मतदान करण्याचा किंवा मदतान करण्यापासून परावृत्त राहण्याचा एखाद्या व्यक्तीचा हक्क असा आहे.