भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १६७ :
विवक्षित अधिनियमांना (कायद्यांना) अधीन असलेल्या व्यक्ती:
भूसेना अधिनियम १९५० (सन १९५० चा ४६), भारतीय नौसेना अधिनियम १९३४ (सन १९३४ चा ४) आता नौसेना अधिनियम १९५७ (१९५७ चा ६२)), वायुसेना अधिनियम सन १९५० (सन १९५० चा ४) यास अधीन असलेली कोणतीही व्यक्ती या प्रकरणात व्याख्या केलेल्यांपैकी कोणत्याही अपराधाबद्दल या संहितेखाली शिक्षेस पात्र होत नाही.