Bns 2023 कलम १६२ : असा हमला करण्याचे अपप्रेरण (चिथावणी) परिणामी हमला घडून आल्यास:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १६२ :
असा हमला करण्याचे अपप्रेरण (चिथावणी) परिणामी हमला घडून आल्यास:
कलम : १६२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : असा हमला करण्यास अपप्रेरणा देणे – हमला घडून आल्यास.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी भारत सरकारच्या भूसेनेतील, नौसेनेतील किंवा वायुसेनेतील अधिकाऱ्याला, भूसैनिकाला नौसेनिकाला किंवा वायुसैनिकाला कोणताही वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, त्या अपप्रेरणाच्या (चिथावणीचा) परिणामी हमला करण्यात आला तर त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply