Bns 2023 कलम १६० : लष्करी बंडाची अपप्रेरण (चिथावणी) – त्याच्या परिणामी बंड घडून आल्यास:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १६० :
लष्करी बंडाची अपप्रेरण (चिथावणी) – त्याच्या परिणामी बंड घडून आल्यास:
कलम : १६०
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लष्करी बंडाचे अपप्रेरण – त्याच्या परिणामी लष्करी बंड घडून आल्यास.
शिक्षा : मृत्यू किंवा आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी भारत सरकारच्या भूसेनेतील, नौसेनेतील किंवा वायुसेनेतील अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसेनिकाला किंवा वायुसैनिकाला बंड करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, त्या अपप्रेरणाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून बंड करण्यात आले, तर मृत्यूची किंवा आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply