भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १४५ :
गुलामांचा नित्यश: व्यवहार करणे :
कलम : १४५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गुलामांचा नित्यश: व्यवहार करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी नित्यश: गुलामांची आयात करील, निर्यात करील, त्यांना अन्य जागी नेईल, त्यांची खरेदी, विक्री, व्यापार किंवा व्यवहार करील त्याला आजीवन कारावासाची किंवा जास्तीत जास्त दहा वर्षे इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.