भारतीय न्याय संहिता २०२३
अपनयन, अपहरण,गुलामगिरी व वेठबिगार यांविषयी :
कलम १३७ :
अपनयन :
कलम : १३७ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपनयन.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) अपनयन दोन प्रकारचे असते भारतातून अपनयन करणे अणि कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करणे-
(a) क) (अ) जो कोणी कोणत्याही व्यक्तीस तिच्या किंवा त्या व्यक्तीच्या वतीने संमती देण्यास विधित: प्राधिकृत असलेल्या व्यक्तीच्या संमतीवाचून भारताच्या सीमेबाहेर नेतो तो त्या व्यक्तीचे भारतातून अपनयन करतो असे म्हटले जाते.
(b) ख) (ब) जो कोणी, कोणत्याही बालकास किंवा कोणत्याही मनोविकल असलेल्या व्यक्तीला अशा बालकाच्या किंवा मनोविकल असलेल्या व्यक्तीच्या कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अशा पालकाच्या संमतीवाचून घेऊन जाईल किंवा भूरळ पाडून नेईल तो अशा बालकाच्या किंवा मनोविकल व्यक्तीचे कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण :
या कलमातील कायदेशीर पालक या शब्दप्रयोगात, जिच्याकडे अशा बालक किंवा अन्य व्यक्तीची देखभाल किंवा अभिरक्षा आहे अशा कोणत्याही व्यक्तीचा समावेश होतो.
अपवाद :
जी कोणतीही व्यक्ती आपण एखाद्या अनौरस बालकाचा पिता असल्याचे सद्भावपूर्वक समजत असेल किंवा अशा बालकाच्या कायदेशीर अभिरक्षेला आपण हक्कदार असल्याचे सद्भावनापूर्वक समजत असेल तिने केलेली कोणतीही कृती जर अनैतिक व अवैध प्रयोजनार्थ करण्यात आलेली नसेल, तर अशा कृतीला हा खंड लागू होत नाही.
२) जो कोणी कोणत्याही व्यक्तीचे भारतातून किंवा कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.