भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १३४ :
एखाद्या व्यक्तीने जवळ बाळगलेल्या मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
कलम : १३४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीने परिधान केलेल्या किंवा जवळ बाळगलेल्या मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणत्याही व्यक्तीने त्या-त्या वेळी परिधान केलेल्या किंवा जवळ बाळगलेल्या कोणत्याही मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना जो कोणी तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करील त्याला, दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.