भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १३३ :
गंभीर प्रक्षोभकारण नसताना एरवी एखाद्या व्यक्तीची मानहानी करण्याच्या उद्देशाने हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
कलम : १३३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारण नसताना एरवी, एखाद्या व्यक्तीची मानहानी करण्याच्या उद्देशाने हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.
शिक्षा : दोन वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
एखाद्या व्यक्तीकडून गंभीर आणि आकस्मिक प्रक्षोभकारण घडले नसताना एरवी, जर कोणी तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केला व त्यायोगे त्या व्यक्तीची मानहानी करण्याचा त्याचा उद्देश असेल तर त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.