भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२ :
एकान्त बंदिवासाची मर्यादा :
एकान्त बंदिवासाच्या शिक्षादेशाची अमलबजावणी करताना, असा बंदिवास कोणत्याही प्रकरणी एका वेळी चौदा दिवसांपैक्षा जास्त असणार नाही व एकांत बंदिवासाच्या कालावधीच्या दरम्यानची कालांतरे अशा कालावधींच्या व्याप्तीपेक्षा कमी असणार नाहीत आणि ठोठावण्यात आलेला कारावास तीन महिन्यांपेक्षा अधिक असेल तेव्हा, एकांत बंदिवास हा दिलेल्या संपूर्ण कारावासाच्या कोणत्याही एका महिन्यामध्ये सात दिवसांपेक्षा अधिक असणार नाही आणि एकांत बंदिवासाच्या कालावधीच्या दरम्यानची कालांतरे अशा कालावधीपेक्षा कमी व्याप्तीची असतील.