Bns 2023 कलम ११५ : इच्छापूर्वक दुखापत पोचवणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११५ :
इच्छापूर्वक दुखापत पोचवणे :
कलम : ११५ (२)
अपराध का वर्गीकरण :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : इच्छापूर्वक दुखापत पोचवणे.
शिक्षा :१ वर्षाचा कारावास किंवा १०००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : जिला दुखापत पोचवण्यात आली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जर कोणी एखादी कृती केली असून त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत व्हावी असा त्याचा उद्देश असेल किंवा त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोचण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे अशी त्याला जाणीव असेल आणि त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोचण्यास तो कारण झाला असेल, तर तो इच्छापूर्वक दुखापत पोचवतो असे म्हटले जाते.
२) कलम १२२ च्या पोटकलम (१) मध्ये उपबंधित केलेली बाब खेरीज करुन एरवी, जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोचवील त्याला, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply