Bns 2023 कलम ११३ : दहशतवादी कृत्य :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११३ :
दहशतवादी कृत्य :
कलम : ११३(२) (क) (अ)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : दहशतवादी कृत्य, परिणामस्वरुप कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होणे.
शिक्षा : मृत्यु किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———-
कलम : ११३(२) (ख) (ब)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही अन्य बाबतीत.
शिक्षा : कारावास, जो ५ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———-
कलम : ११३(३)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न, षडयंत्र, अपप्रेरण करणे किंवा जाणूनबुझून त्याला सुकर बनविणे.
शिक्षा : कारावास, जो ५ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———-
कलम : ११३(४)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी कॅम्प, प्रशिक्षण इत्यादी आयोजित करणे.
शिक्षा : कारावास, जो ५ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———-
कलम : ११३(५)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे, जो दहशतवादी कृत्यांमध्ये अंतवर्लित आहे.
शिक्षा : आजीवन कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———-
कलम : ११३(६)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीला ज्याने दहशतवादी कृत्य केले आहे त्याला आसरा देणे किवा लपविणे.
शिक्षा : कारावास जो ३ वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावास पर्यंत असू शकेल व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———-
कलम : ११३(७)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : दहशतवादी कृत्यातून उत्पन्न किंवा प्राप्त झालेली संपत्ति धारण करणे.
शिक्षा : आजीवन कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जो कोणी, भारताची एकता, अखंडता, संप्रभूता, सुरक्षितता किंवा आर्थिक सुरक्षा किंवा प्रभुता धोक्यात आणणे किंवा धोक्यात आणण्याच्या संभावनेच्या आशयाने किंवा भारतातील किंवा विदेशातील जनता किंवा जनतेच्या कोणत्याही वर्गात दहशतवाद पसरविणे किंवा दहशतवाद पसरविण्याच्या संभावने च्या आशयाने निम्नलिखित कृत्य करतो म्हणजे तो दहशतवादी कृत्य करतो असे म्हटले जाईल, अर्थात:-
(a) क) (अ) बॉम्ब, डायनामाइट्स किंवा इतर स्फोटक पदार्थ किंवा ज्ववलनशील पदार्थ किंवा अग्नायुध (बंदुक) किंवा इतर प्राणघातक शस्त्रे किंवा विष किंवा हानिकारक वायु किंवा इतर रसायने किंवा इतर कोणतेही पदार्थ (जैविक, रेडियोधर्मी किंवा न्यूक्लीयर असेल अन्यथा) निसर्गात घातक अशा प्रकारे वातावरण निर्माण करण्यासाठी वापरणे, यांचा वापर करुन अशी कृती करतो, ज्यामुळे –
एक) कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींचा मृत्यु होतो किंवा त्यांना इजा होते किंवा होण्याची संभावना आहे; किंवा
दोन) मालमत्तेची हानी किंवा त्याचे नुकसान किंवा विनाश होतो किंवा होण्याची संभावना आहे; किंवा
तीन) भारत किंवा विदेशतील समुदायाच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही पुरवठा किंवा सेवांमध्ये अडथळा येतो किंवा येण्याचा संभावना आहे; किंवा
चार) नाण्याचे उत्पादन किंवा तस्करी किंवा प्रसार किंवा बनावट भारतीय कागदी चलनाच्या इतर कोणत्याही वस्तुमुळष भारताच्या आर्थिक स्थिरतेला हानी पाहोचते किंवा पोहोचण्याची संभावना आहे; किंवा
पाच) भारताच्या संरक्षणाच्या संदर्भात किंवा भारत सरकारच्या, कोणत्याही राज्य सरकारच्या किंवा त्यांच्या कोणत्याही अभिकरणांच्या इतर कोणत्याही हेतुंसाठी वापरल्या जाणाèया किंवा वापरण्याच्या उद्देशाने भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होणे किंवा होण्याची संभावना आहे; किंवा
(b) ख) (ब) सार्वजनिक कार्यकत्र्यांमध्ये (सरकारी कामे असलेला) आपराधिक बलाचा वापर करुन किंवा आपराधिक बलाचा प्रदर्शन करुन दहशत निर्माण करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यकत्र्याच्या मृत्युस कारणीभूत होणे किंवा मृत्यु घडवून आणण्याचा प्रयत्न करणे;
(c) ग) (क) कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेणे, पळवून नेणे किंवा अपहरण करणे किंवा अशा व्यक्तीला जीवे मारण्याची किंवा हानी पोहोचवण्याची धमकी देणे किंवा भारत सरकार, कोणतेही राज्य सरकार किंवा कोणतेही विदेशी सरकार किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा आंतर-सरकारी संस्था किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला कोणतेही कृत्य करण्यास भाग पाडण्यासाठी किंवा कोणतीही कृती करण्यास परावृत्त करण्यासाठी अन्य कृत्य करतो.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी,-
(a) क) (अ) सार्वजनिक कार्यकत्र्या म्हणजे संवैधानिक प्राधिकारी किंवा केन्द्र सरकार द्वारा राजपत्रात सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून अधिसूचित कोणताही अन्य कार्यकर्ता होय;
(b) ख) (ब) बनावट भारतीय चलन म्हणजे असे बनावट चलन जे अधिकृत किंवा अधिसूचित न्यायिक प्राधिकारणाद्वारे असे चलन अनुकरण आहे किंवा भारतीय चलनाच्या मुख्य सुरक्षा वैशिष्ट्यांशी सुसंगत आहे की नाही हे तपासल्यानंतर असे घोषित केले जाते.
२) जो कोणी संगठित गुन्हेगारीचा अपराध करील ,-
(a) क) (अ) जर अशा अपराधामुळे कोणत्याही व्यक्तिचा मृत्यु झाला असेल तर, तो मृत्युदंडांची किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेसे पात्र ठरेल आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र ठरेल;
(b) ख) (ब) कोणत्याही अन्य बाबतीत, पाच वर्षाहून कमी नसेल परंतु, आजीवन कारवासा पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
३) जो कोणी दहशतवादी कार्य करण्याचे षडयंत्र, प्रयत्न करतो किंवा पक्ष समर्थन, अपप्रेरण करतो, सल्ला देतो किंवा उदिप्त करतो किंवा प्रत्यक्ष रुपाने किंवा माहीती असताना ते सुकर बनविवतो किंवा कोणतेही दहशतवादी कृत्य प्रारंभ करण्यासाठी कोणतेही कार्य करतो, तो पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
४) जो कोणी दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रशिक्षणासाठी कोणतेही शिबिर किंवा शिबिरे आयोजित करतो किंवा आयोजित करण्यास कारणीभूत ठरतो किंवा दहशतवादी कृत्य करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची किवा व्यक्तींची भरती करतो किंवा भरती करण्यासा कारणीभूत ठरतो, तर तो पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
५) आतंकवादी संगठनेचा सदस्य असणारी, आतंकवादी कार्यामध्ये अंतवर्लित असणारी कोणतीही व्यक्ति पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
६) जो कोणी व्यक्ती उद्देशपूर्वक, जाणीव असाताना, आतंकवादी कार्य केल्याचा अपराध केला आहे अशा व्यक्तीस आसरा देईल किंवा लपवून ठेवील किंवा आसरा देण्याचा किंवा लपवून ठेवण्याचा प्रयत्न करील तो तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र ठरेल :
परंतु, ज्या प्रकरणांमध्ये गुन्हेगाराच्या पती-पत्नीने आश्रय देणे किंवा लपविण्याचे कृत्य केले आहे अशा प्रकरणांमध्ये हे पोटकलम लागू होणार नाही.
७) जो कोणी, दहशतवादी कृत्यामुळे उत्पन किंवा प्राप्त किंवा दहशतवादी कृत्याच्या माध्यातून अर्जित कोणतीही मालमत्ता जाणीव असाताना बाळगतो किंवा धारण करतो, तो आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
स्पष्टीकरण :
शंकांचे निरसन करण्यासाठी, याद्वारे असे घोषित केले जाते की पोलीस अधीक्षक दर्जाच्या खाली नसलेला अधिकारी या कलमाखाली किंवा बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) अधिनियम १९६७ (१९६७ चा ३७) या अन्वये गुन्हा नोंदवायचा की नाही हे ठरवेल.

Leave a Reply