भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११२ :
छोटे संगठित अपराध :
कलम : ११२
अपराध का वर्गीकरण :
अपराध : छोटे संगठित अपराध.
शिक्षा : कारावास जो एक वर्षापेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षापर्यंत असू शकेल आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) जो कोणी समूह किंवा टोळी चा सदस्य असताना, एकतर एकल पद्धतीने किंवा संघटित पद्धतीने, चोरी, झपटमारी (हिसकावणे), छळ, तिकिटांची अवैध विक्री, अप्राधिकृत पैज लावने किंवा जुगार खेळणे, सार्वजनिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची विक्री किंवा इतर समरुप आपराधिक कार्य करतो, तो छोटा संगठित अपराध करतो.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी चोरी मध्ये छळ-कपटाने-चालाखीने चोरी, वाहन किंवा वाहनातून चोरी, घरेलू किंवा व्यावसायकि चोरी, मालवाहू (कार्गो) तून चोरी, खिसे कापने (पाकीट चोरणे), कार्ड स्कीमिंग, दुकान फोडून किंवा तोडून चोरी आणि स्वचालित टेलर मशीन ची चोरी यांचा समावेश आहे.
२) जो कोणी कोणताही छोटा संगठित अपराध करील त्याला एक वर्षापेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल.