भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १०४ :
आजन्म कारावास (जन्मठेप) भोगत असलेल्या कैद्याने खून केल्यास शिक्षा:
कलम : १०४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जन्मठेप – कैद्याने खून करणे.
शिक्षा : मृत्यू किंवा आजीवन कारावास, याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावास.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी प्रत्यक्षात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे आणि तसे असताना जर तो खून करील त्याला मृत्यूची किंवा आजीवन कारावासाची याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावासाची शिक्षा होईल.