Bns 2023 कलम ८२ : पती किंवा पत्नी हयात असतानाच्या काळात पुन्हा विवाह करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ८२ :
पती किंवा पत्नी हयात असतानाच्या काळात पुन्हा विवाह करणे :
कलम : ८२ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पती किंवा पत्नी हयात असतानाच्या काळात पुन्हा विवाह करणे.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : असा विवाह करणाऱ्या व्यक्तीचा पती किंवा पत्नी..
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ८२ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्या व्यक्तीबरोबर नंतरचा विवाह झाला असेल तिच्यापासून, पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवण्याने घडणारा तोच अपराध.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) पती किंवा पत्नी जिवंत असताना जो कोणी विवाह करील आणि असा विवाह अशा पतीच्या किंवा पत्नीच्या हयातीत झाला या कारणामुळे तो रद्दबातल असेल तर, त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
अपवाद :
ज्या कोणत्याही व्यक्तीचा अशा पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर झालेला विवाह सक्षम अधिकारता असलेल्या न्यायालयाने रद्दबातल असल्याचे घोषित केलेले असेल, त्या व्यक्तीला हे कलम लागू होत नाही, तसेच, जी कोणतीही व्यक्ती अगोदरच्या पतीच्या किंवा पत्नीच्या हयातीत विवाह करील आणि असा पती किंवा पत्नी नंतरच्या विवाहाच्या वेळी अशा व्यक्तीपासून सात वर्षेपर्यंत सातत्याने दूर राहिलेला / राहिलेली असेल आणि तो / ती जिवंत असल्याचे त्या कालावधीत अशा व्यक्तीच्या ऐकिवात आले नसेल तर, त्या व्यक्तीला हे कलम लागू होत नाही. मात्र, असा नंतरचा विवाह करणाऱ्या व्यक्तीने ज्या व्यक्तीशी असा विवाह करण्यात येईल तिला आपल्याला माहीत असेल त्या मर्यादेपर्यंत खरी वस्तुस्थिती विदित करायला हवी.
२) जो कोणी नंतरचा विवाह ज्या व्यक्तीबरोबर झाला आहे त्या व्यक्तीपासून पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवून त्याद्वारे पोटकलमा (१) मध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध करील त्याला दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply