भारतीय न्याय संहिता २०२३
स्त्री विरुद्ध फौजदारीपात्र बलप्रयोग आणि हमला याविषयी :
कलम ७४ :
स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
कलम : ७४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग.
शिक्षा : किमान १ वर्षांचा कारावास किंवा कमाल ५ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जर कोणी कोणत्याही स्त्रीवर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केला आणि तिचा विनयभंग करण्याचा त्यामागे उद्देश असेल किंवा त्यामुळे आपल्याकडून तसा विनयभंग होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर त्याला, एक वर्षापेक्षा कमी नसेल परंतु पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल आणि तसेच तो दंडासही पात्र असेल.