भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २९३ :
सार्वजनिक उपद्रव थांबविण्याबाबतच्या आदेशानंतरही तो चालू ठेवणे :
कलम : २९३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : उपद्रव थांबण्याबाबतच्या व्यादेशानंतरही तो चालू ठेवणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपयांपर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
सार्वजनिक उपद्रवाची पुनरावृत्ती न करण्याविषयी किंवा तो चालू न ठेवण्याविषयी व्यादेश(आदेश) काढण्याचा कायदेशीर प्राधिकार (अधिकार) असलेल्या कोणत्याही लोकसेवकाने असा व्यादेश (आदेश) दिलेला असता जो कोणी अशा उपद्रवाची पुनरावृत्ती करील किंवा तो चालू ठेवील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.