Bns 2023 कलम २८५ : सार्वजनिक रस्त्यामधील किवा नौकानयन मार्गातील धोका किंवा अटकाव :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८५ :
सार्वजनिक रस्त्यामधील किवा नौकानयन मार्गातील धोका किंवा अटकाव :
कलम : २८५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही सार्वजनिक रस्त्यात किंवा नौकानयन मार्गात धोका निर्माण करणे, अटकाव करणे किंवा क्षती पोचवणे.
शिक्षा : ५००० रुपये द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी, एखादी कृती करून अगर अकृती (टाळून) करून अथवा आपल्या कब्जात असलेल्या किंवा हुकमतीखाली असलेल्या कोणत्याही मालमत्तेचा बंदोबस्त करण्याचे टाळून कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावरील अथवा सार्वजनिक नौकानयन मार्गावरील कोणत्याही व्यक्तीला धोका, अटकाव किंवा इजा करील, तर त्याला, पाच हजार रूपयांपर्यंत इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

Leave a Reply