भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २७४ :
विक्रीसाठी असलेल्या खाद्यपदार्थांत किंवा पेयांत भेसळ करणे :
कलम : २७४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : विक्रीसाठी असलेल्या खाद्यपदार्थात किंवा पेयात, ते अपायकारक होईल अशा प्रकारे भेसळ करणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जर कोणी कोणताही खाद्यपदार्थ किंवा पेयपदार्थ अन्न किंवा पेय म्हणून अपायकारक होईल अशा प्रकारे अशा पदार्थांत भेसळ केली व असा पदार्थ अन्न किवा पेय म्हणून विकण्याचा त्याचा उद्देश असेल अथवा तो अन्न किंवा पेय म्हणून विकला जाणे संभवनीय याची त्याला जाणीव असेल, तर त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.