भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २६६ :
शिक्षामाफीच्या शर्तीचा भंग :
कलम : २६६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : शिक्षामाफीच्या शर्तीचा भंग.
शिक्षा : मूळच्या शिक्षा आदेशातील शिक्षा किंवा शिक्षेचा एखादा भाग भोगून झालेला असल्यास, उरलेली शिक्षा
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : मूळच्या अपराध ज्या न्यायालयात विचारणीय योग्य असेल ते न्यायालय.
———
कोणतीही सशर्त शिक्षामाफी स्वीकारल्यानंतर जो कोणी ज्या शर्तीवर अशी माफी देण्यात आली अशा कोणत्याही शर्तीचा जाणीवपूर्वक भंग करील त्याला मुळात जी शिक्षा देण्यात आली होती ती त्याने त्याआधी अजिबात भोगलेली नसेल तर तेवढी शिक्षा होईल आणि ती शिक्षा त्याने काही अंशी भोगली असेल, तर त्याने त्याआधी जेवढी शिक्षा भोगलेली नसेल तेवढी शिक्षा होईल.