भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २५४ :
लुटारू किंवा दरोडेखोर यांना आसरा दिल्याबद्दल दंड :
कलम : २५४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लुटारू किंवा दरोडेखोर यांना आसरा देणे.
शिक्षा : ७ वर्षाचा सश्रम कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
काही व्यक्ती (इसम) जबरी चोरी करण्याच्या किंवा दरवडा घालण्याच्या बेतात आहेत अथवा त्यांनी अलीकडेच जबरी चोरी केलेली आहे, किंवा दरवडा घातलेला आहे हे माहीत असून किंवा तसे समजण्यास कारण असून जो कोणी अशी जबरी चोरी करणे किंवा दरवडा घालणे सुकर (सोपे) करण्याच्या अथवा त्यांना किंवा त्यांच्यापैकी कोणालाही वैध (कायदेशीर) शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने त्यांना किंवा त्यांच्यापैकी कोणालाही आसरा देईल त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, जबरी चोरी किंवा दरवडा भारतात की, भारताबाहेर घडला किंवा घडविण्याचा उद्देश होता हा मुद्दा गौण आहे.
अपवाद :
या बाबतीत अपराधी (अटक करावयाच्या) व्यक्तीचा पती किंवा पत्नी यांना आसरा दिलेला असेल किंवा लपविलेले असेल, त्या बाबतीत, हे कलम लागू होत नाही.