भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २४८ :
क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उदेशाने अपराधाचा खोटा दोषारोप करणे :
कलम : २४८ (क) (अ)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : क्षती पोचवण्याच्या उद्देशाने अपराधाचा खोटा दोषारोप करणे.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास किंवा २००००० रुपए द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : २४८ (ख) (ब)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जर मृत्युच्या, आजन्म कारावासाच्या किंवा सात वर्षे अगर त्याहून अधिक (जास्त) मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र अशा अपराधाच्या खोटया दोषारोपावरुन अशी फौजदारी कार्यवाही सुरु करण्यात आली तर.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी एखाद्या व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उद्देशाने, त्या व्यक्तीविरुध्द फौजदारी कार्यवाही करण्यास अगर त्या व्यक्तीने अपराध केलेला आहे असा दोषारोप करण्यास न्याय्य किंवा कायदेशीर कारण नाही हे माहीत असून, त्या व्यक्तीविरुध्द अशी कोणतीही कार्यवाही सुरु करील किंवा सूरु करवील अथवा त्या व्यक्तीवर असा खोटा दोषारोप करील त्याला
(a) क) (अ) पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची ,कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
(b) ख) (ब) जर मृत्युच्या, आजन्म कारावासाच्या किंवा सात वर्षे अगर त्याहून अधिक (जास्त) मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र अशा अपराधाच्या खोटया दोषारोपावरुन अशी फौजदारी कार्यवाही सुरु करण्यात आली तर, त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.