भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २३५ :
खोटे असल्याचे माहीत असलेले प्रमाणपत्र खरे म्हणून वापरणे:
कलम : २३५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खोटे असल्याचे स्वत:ला माहीत असलेले प्रमाणपत्र खरे म्हणून वापरणे.
शिक्षा : खोटा पुरावा देण्याबद्दल किंवा रचण्याबद्दल असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : खोटा पुरावा देण्याचा अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
असे कोणतेही प्रमाणपत्र हे एखाद्या महत्वाच्या मुद्दयाबाबत खोटे असल्याचे माहीत असताना खरे प्रमाणपत्र म्हणून जो कोणी भ्रष्टतापूर्वक वापरील किंवा वापरण्याचा प्रयत्न करील त्याला, जणू काही त्यानेच खोटा पुरावा दिलेला असावा त्याप्रमाणे त्याच रीतीने शिक्षा होईल.