Bns 2023 कलम २०७ : समन्सची बजावणी किंवा इतर कार्यवाही यांस प्रतिबंध करणे किंवा त्याच्या प्रकाशनाला (प्रसिध्दीला) प्रतिबंध करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २०७ :
समन्सची बजावणी किंवा इतर कार्यवाही यांस प्रतिबंध करणे किंवा त्याच्या प्रकाशनाला (प्रसिध्दीला) प्रतिबंध करणे :
कलम : २०७ (क) (अ)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणतेही समन्स किंवा नोटीस बजावण्यास किंवा लावण्यास प्रतिबंध करणे, अथवा ती लावली असता काढून टाकणे अथवा उद्घोषणाला प्रतिबंध करणे.
शिक्षा : १ महिन्याचा साधा कारावास किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : २०७ (ख) (ब)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जर समन्स इत्यादी द्वारे जातीने हजर राहणे, इत्यादी आवश्यक केले असेल तर.
शिक्षा : ६ महिन्याचा साधा कारावास किंवा १०००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
लोकसेवक म्हणून समन्स, नोटीस अगर आदेश काढण्यास विधित: (कायद्याने) सक्षम असलेल्या अशा कोणत्याही लोकसेवकाकडून निघालेले असे समन्स, नोटीस किंवा आदेश यांची स्वत: वर अगर इतर कोणत्याही व्यक्तीवर बजावणी होण्यास जो कोणी कोणत्याही प्रकारे उद्देशपूर्वक प्रतिबंध करील, किंवा असे समन्स, नोटीस अगर आदेश कोणत्याही जागी कायदेशीरपणे लावण्यास उद्देशपूर्वक प्रतिबंध करील, किंवा असे कोणतेही समन्स, नोटीस अगर आदेश जेथे ते कायदेशीरपणे लावलेले असेल त्या जागेतून उद्देशपूर्वक काढून टाकील,
किंवा लोकसेवक म्हणून कोणताही जाहीरनामा काढण्याचा निदेश देण्यास विधित: (कायदेशीरपणे) सक्षम असलेल्या अशा कोणत्याही लोक सेवकाच्या प्राधिकारान्वये असा कोणताही जाहीरनामा कायदेशीरपरणे काढण्याला उद्देशपूर्वक प्रतिबंध करील,-
(a) क) (अ) त्याला एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतकया द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील;
(b) ख) (ब) जर समन्स, नोटीस, आदेश अगर जाहीरनामा, न्यायालयात जातीने किंवा अभिकर्त्यामार्फत (एजंटातर्फे) हजर राहण्याविषयी अथवा दस्तऐवज किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक – अभिलेख हजर करण्याविषयी असेल तर सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा दहा हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply