Bns 2023 कलम १९६ : धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १९६ :
धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे :
कलम : १९६ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : १९६ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : उपासनास्थान, इत्यादी ठिकाणी वर्गावर्गांमध्ये शत्रुत्व वाढवणे.
शिक्षा : ५ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) जर कोणी,-
(a) क) (अ) तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे अथवा खुणांद्वारे अथवा दृश्य प्रतिरुपणांद्वारे (देखाव्याद्वारे) अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अथवा इतर अन्य प्रकारे, धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणांवरून निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेषाच्या किंवा दुष्टाव्याच्या भावना वाढवल्या किंवा वाढवण्याचे प्रयत्न केले तर; अथवा
(b) ख) (ब) निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी आणि ज्यामुळे सार्वजनिक प्रशांतता बिघडते किंवा बिघडणे संभवनीय असते अशी कोणतीही कृती केली तर; अथवा
(c) ग) (क) कोणतेही अभ्यसन (कसरत), हालचाल, कवायत किंवा अन्य तत्सम क्रियाव्यापार यांचे संयोजन केले अशा क्रियाव्यापारात भाग घेणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जात अगर जनसमाज यांच्याविरुद्ध फौजदारीपात्र बलप्रयोग किंवा हिंसाचार करावा अगर त्या कामी त्या शिकून तयार व्हाव्यात असा त्याचा उद्देश असेल अगर अशा क्रियाव्यापारात भाग घेणाऱ्या व्यक्ती त्याप्रमाणे त्यांच्याविरुद्ध फौजदारीपात्र बलप्रयोग किंवा हिंसाचार करतील किंवा त्या कामी शिकून तयार होतील अशी त्याला जाणीव असेल तर अथवा त्याप्रमाणे त्यांच्याविरुद्ध फौजदारीपात्र बलप्रयोग किंवा हिंसाचार करण्याच्या किंवा त्या कामी शिकून तयार होण्याच्या उद्देशाने किंवा अशा क्रियाव्यापारात भाग घेणाऱ्या व्यक्ती त्याप्रमाणे त्यांच्याविरुद्ध फौजदारीपात्र बलप्रयोग किंवा हिंसाचार करतील असा संभव असल्याच्या जाणिवेने अशा क्रियाव्यापारात भाग घेतला आणि कोणत्याही कारणास्तव का होईना, अशा क्रियाव्यापारामुळे असा धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जात अगर जनसमाज याच्या सदस्यांमध्ये भीती किंवा घबराट किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली किंवा निर्माण होणे संभवनीय असेल तर,
त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
२) जो कोणी पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेला एखादा अपराध एखाद्या उपासनास्थानी अथवा धार्मिक उपासना किंवा धार्मिक संस्कारविधी करण्यात गुंतलेल्या एखाद्या जमावामध्ये करील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply