Bns 2023 कलम १९२ : दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने बेछूटपणे प्रक्षोभन (चिथावणी) करणे – दंगा घडून आल्यास, दंगा घडून न आल्यास :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १९२ :
दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने बेछूटपणे प्रक्षोभन (चिथावणी) करणे – दंगा घडून आल्यास, दंगा घडून न आल्यास :
कलम : १९२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने बेछूटपणे प्रक्षोभन करणे – दंगा घडून आल्यास.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
अपराध : दंगा घडून न आल्यास.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जी अवैध (बेकायदेशीर) आहे अशी कोणतीही गोष्ट (कृती) करून जो कोणी एखाद्या व्यक्तीला बेछूटपणे प्रक्षोभित (चिथावणी) करील अशा प्रक्षोभनामुळे (चिथावणीमुळे) दंग्याचचा अपराध घडावा असा त्याचा उद्देश असेल किंवा तसे घडणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल तेव्हा, अशा प्रक्षोभनाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून दंग्याचा अपराध घडला तर, त्याला एक वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील आणि जर दंग्याचा अपराध घडला नाही, तर त्याला सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply