भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७६ :
निवडणुकी संबंधात अवैधपणे (बेकायदेशीरपणे) पैसे खर्च करणे :
कलम : १७६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : निवडणुकी संबंधात बेकायदेशीरपणे पैसे खर्च करणे
शिक्षा : १०००० रुपये द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
उमेदवाराकडून सर्वसाधारण किंवा विशेष लेखी प्राधिकार (अधिकारपत्र) नसताना जो कोणी, अशा उमेदवाराच्या निवडणुकीला चालना देण्याकरिता किंवा त्यास निवडून आणण्याकरिता कोणतीही सार्वजनिक सभा भरविणे करता अथवा कोणतीही जाहिरात, परिपत्रक, किंवा प्रकाशन यावर अथवा अन्य कोणत्याही प्रकारे खर्च करील किंवा त्यास प्राधिकृती (अधिकार) देईल त्याला, पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
परंतु, जर कोणत्याही व्यक्तीने प्राधिकार (अधिकारपत्र) नसताना जास्तीत जास्त दहा रूपये पर्यंत काही रक्कम अशा रीतीने खर्च केल्यानंतर, असा खर्च केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत तया खर्चास उमेदवाराची लेखी मान्यता मिळविली तर, तिने उमेदवाराच्या प्राधिकारानिशी (अधिकारानेच) असा खर्च केला असल्याचे समजण्यात येईल.