भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १६६ :
भूसैनिकाच्या, नौसैनिकाच्या किंवा वायुसैनिकाच्या शिरजोरीच्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) देणे:
कलम : १६६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला शिरजोरीने कृत्य करण्यास अपप्रेरणा देणे – परिणामी अपराध घडल्यास.
शिक्षा : दोन वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी भारत सरकारच्या भूसेनेतील, नौसेनेतील, किंवा वायुसेनेतील कोणत्याही अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला, किंवा वायुसैनिकाला जी कृती शिरजोरीची ठरेल हे स्वत:ला माहीत असून, अशी कृती करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, त्या अपप्रेरणेच्या (चिथावणीच्या) परिणामी अशी शिरजोरीची कृती करण्यात आली, तर दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.