Bns 2023 कलम १५७ : लोकसेवकाने हयगयीने अशा कैद्याला पळून जाऊ देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १५७ :
लोकसेवकाने हयगयीने अशा कैद्याला पळून जाऊ देणे :
कलम : १५७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने हयगयीने आपल्या हवालतीतील राजकैद्याला किंवा युद्धकैद्याला पळून जाऊ देणे.
शिक्षा : ३ वर्षाचा साधा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी लोकसेवक असून आणि त्याच्या स्वत:कडे कोणत्याही राजकैद्याची अगर युध्दकैद्याची हवालत असताना, जेथे अशा कैद्याला बंदिवासात ठेवले असेल अशा कोणत्याही बंदिवासाच्या ठिकाणाहून अशा कैद्याला हयगयीने पळून जाऊ देईल, तर त्यास तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतकया मुदतीची साध्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply