भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १५० :
युध्द करण्याचा बेत ते सुकर करण्याच्या उद्देशाने लपविणे :
कलम : १५०
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : युद्ध करण्याचा बेत, ते सुकर करण्याच्या उद्देशाने लपविणे.
शिक्षा : १० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जर कोणी कृती अगर अकृती करून भारत सरकार विरूध्द युध्द करण्याचा बेत अस्तित्वात असल्याचे लपवील आणि अशा लपवणुकीमार्फत असे युध्द सोपे केले जावे असा उद्देश असेल आणि त्यामुळे तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल, तर त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.