Bns 2023 कलम १४३ : व्यक्तींचा अपव्यापार करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १४३ :
व्यक्तींचा अपव्यापार करणे :
कलम : १४३ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : व्यक्तींचा अपव्यापार करणे.
शिक्षा :किमान ७ वर्षांचा कठोर कारावास किंवा कमाल १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
कलम : १४३ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एकापेक्षा अधिक व्यक्तींचा अपव्यापार.
शिक्षा : किमान १० वर्षांचा कठोर कारावास किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
कलम : १४३ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बालकाचा अपव्यापार.
शिक्षा : किमान १० वर्षांचा कठोर कारावास किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
कलम : १४३ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एकापेक्षा अधिक बालकाचा अपव्यापार.
शिक्षा : किमान १४ वर्षांचा कठोर कारावास किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
कलम : १४३ (६)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एकापेक्षा अधिक वेळा बालकाचा अपव्यापार करण्याच्या अपराधासाठी सिद्धदोष ठरलेल्यास.
शिक्षा : आजीवन कारावास याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
कलम : १४३ (७)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बालकाचा अपव्यापार करण्यात गुंतलेला लोकेसेवक किंवा पोलीस अधिकारी.
शिक्षा : आजीवन कारावास याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
१) जो कोणी, पिळवणूक करण्याच्या प्रयोजनासाठी –
(a) क) धमक्यांचा वापर करुन किंवा
(b) ख) बळाचा किंवा इतर कोणत्याही जबरदस्तीचा वापर करुन, किंवा
(c) ग) अपहरण करुन, किंवा
(d) घ) लबाडी करुन किंवा फसवणूक करुन, किंवा
(e) ङ) अधिकाराचा गैरवापर करुन, किंवा
(f) च) भरती केलेल्या, वाहतूक केलेल्या, आसरा दिलेल्या, स्थानांतरण केलेल्या किंवा स्वीकार केलेल्या व्यक्तीवर नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्यासाठी प्रलोभन दाखवून तसेच, प्रदाने किंवा लाभ देऊन किंवा घेऊन, एखाद्या किंवा अनेक व्यक्तींनी भरती करील, वाहतूक करील, आसरा देईल, स्थानांतरण करील किंवा स्वीकार करील तर,
तिने अपव्यापाराचा अपराध केला असे होईल.
स्पष्टीकरण १ :
पिळवणूक या संज्ञेमध्ये शारीरिक पिळवणुकीची कोणतीही कृती किंवा लैंगिक पिळवणुकीचा, गुलामगिरीचा किंवा गुलामगिरीसदृश प्रथेचा, दास्याचा कोणताही प्रकार किंवा जबरदस्तीने अवयव काढून घेणे यांचा समावेश होतो.
स्पष्टीकरण २ :
अपव्यापाराचा अपराध झाल्याचे निर्धारित करताना पीडित व्यक्तीची संमती महत्वाची नाही.
२) जो कोणी अपव्यापाराचा अपराध करील त्याला सात वर्षांपेक्षा कमी नसेल; परंतु दहा वर्षांपर्यंत असू शकेल अशी सक्षम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
३) अपराधात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा अपव्यापार करण्याचा अंतर्भाव असेल अशा बाबतीत, त्याला दहा वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु जी आजीवन कारावासापर्यंतची असू शकेल अशी सश्रम (कठोर) कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
४) अपराधामध्ये बालकाचा अपव्यापार करण्याचा अंतर्भाव असेल अशा बाबतीत, त्याला दहा वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु जी आजीवन कारावासापर्यंतची असू शकेल अशी सश्रम (कठोर) कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
५) अपराधामध्ये एकापेक्षा अधिक बालकांचा अपव्यापार करण्याचा अंतर्भाव असेल अशा बाबतीत, त्याला चौदा वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु जी आजीवन कारावासापर्यंतची असू शकेल अशी सश्रम (कठोर) कारावासाची शिक्षा होईल आणि तो, द्रव्यदंडासही पात्र असेल.
६) जर एखाद्या व्यक्तीला बालकाचा अपव्यापार करण्याच्या अपराधासाठी एकापेक्षा अधिकवेळा सिद्ध दोष ठरवले असेल तर तिला आजीवन कारावासाची शिक्षा होईल याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावासाची शिक्षा होईल आणि ती, द्रव्यदंडासही पात्र असेल.
७) जेव्हा एखादा लोकसेवकाचा किंवा पोलीस अधिकाऱ्याचा कोणत्याही व्यक्तीच्या अपव्यापारामध्ये सहभाग असेल तर, असा लोकसेवक किंवा पोलीस अधिकारी याला आजीवन कारावासाची शिक्षा होईल याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल.

Leave a Reply